शेतकऱ्यांच्या पशुंसाठी शासनाने पशुसंवर्धन दवाखान्यांची व्यवस्था अनेक ग्रामपातळीवर केलेली आहे. बहुतांश वेळा पशुंच्या आरोग्य समस्या रात्री किंवा सुटीच्या दिवशी उद्भवल्यास शासकीय सेवेतील पशुचिकित्सकांना शेतकऱ्यांच्या दारात भेट देऊन पशुचिकित्सा करण्याचा शासन निर्णय आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना पशुचिकित्सकाला काही फीस द्यावी लागते.
शासनाने २०१० मध्ये अशा भेटीसाठी रक्कम नियोजित केलेली आहे. या रकमेव्यतिरिक्त पशुचिकित्सकाला जास्तीची रक्कम घेता येत नाही. मात्र, आता शासनाने या रकमेत वाढ केली असून, ती पुढीलप्रमाणे आहे. शल्यचिकित्सेसाठी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येक भेटीच्या वेळी ५० रुपये दिले जात होते.
या दरात शासनाने वाढ करून ते ७५ रुपये केले आहे. कार्यक्षेत्राबाहेरील दर १०० वरून १५० रुपये. रात्रीच्या वेळी सेवा द्यायची झाल्यास अतिरिक्त २० ऐवजी ७५ रुपये, जनन प्रक्रियेत बाधा आल्यास अतिरिक्त ५० ऐवजी ७५ रुपये, तसेच आरोग्य दाखला देण्यासाठी पुर्वीपेक्षा ५० रुपयांनी वाढ केली आहे. याचप्रमाणे शवविच्छेदन दाखले देण्याच्या रक्कमेत वाढ केली आहे.