ऑनलाइन लोकमत/मुकुंद मधुकरराव चिलवंतलातूर, दि. 25 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. निलंगा तालुक्यातील हलगरा या गावांत लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेखाली झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा होता. मुख्यमंत्री हलगरा येथे येताच सर्वप्रथम त्यांनी श्रमदान केले. मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या हातात फावडे आणि टोपले घेऊन श्रमदानाला सुरुवात केली. केवळ हातात फावडे घेऊन फोटोपुरते श्रमदान न करता मुख्यमंत्री महोदयांनी तब्बल 20 ते 25 मिनिटे श्रमदान केले. मुख्यमंत्री महोदयांनी फावड्याने 1 ते 2 फूट खोदले आणि निघालेली माती स्वत: उचलून बांधावर टाकली. श्रमपरिहारानंतर मुख्यमंत्री महोदय गावकऱ्यांसोबत बाजेवर बसून गरम गरम न्याहरीचा आस्वाद घेणार होते. दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी गांवकऱ्यांसोबत एका झाडाखाली संवाद साधला. त्यांनी गांवकऱ्यांच्या भावना अगदी तळमळीने जाणून घेतल्या. मुख्यमंत्री स्वत: मार्गदर्शनासाठी उभे राहिले आणि गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री ज्या आंब्याच्या झाडाखाली उभे राहून उपस्थितांशी संवाद साधत होते, अगदी त्याच ठिकाणी त्यांच्या डोक्यावर एक तुटलेली फांदी कुठल्याही वेळी पडेल, अशा अवस्थेत होती. त्या फांदीकडे एका ग्रामस्थाचे लक्ष गेले आणि ते मुख्यमंत्र्यांना म्हणाले ह्यआपण थोडे बाजूला उभे राहा, आपल्या डोक्यावरची फांदी तुटलेली आहे, ती आपल्या डोक्यावर पडेल,ह्ण त्यावर मुख्यमंत्री जागेवरून थोडेसे बाजूला होत म्हणाले, "घाबरु नका, मला काही होणार नाही. तुमच्यासारख्या अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला काही होणार नाहीह्ण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि आपले महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न लोकांपुढे मांडत राहिले.संवाद संपताच मुख्यमंत्री बाजेवर बसले. बसताना माझ्या शेजारी बसलेले एक पत्रकार मुख्यमंत्र्यांना म्हणाले ह्य मुख्यमंत्री महोदय थोडे सरकून बसा....वर अडकलेली झाडाची फांदी अंगावर पडेलह्ण तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ह्य मला काही होणार नाही, आशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली माझ्या पाठीशी आहेतह्ण. खरंच या वाक्याचा प्रत्यय काही वेळातच आला. मुख्यमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टर कोसळले. मात्र मुख्यमंत्री महोदयांना थोडीही इजा झाली नाही. कारण ह्यआशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली त्यांच्या पाठीशी आहेतह्ण याचा प्रत्यय आला.(लेखक औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी आहेत)
आशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली माझ्या पाठीशी...
By admin | Published: May 25, 2017 5:41 PM