मुंबई : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच, १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. "माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा", अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे यांनी जुन्या भाषणातून महाराष्ट्राबद्दल जे मनोगत व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून जेव्हा मनसेची स्थापना केली. त्यावेळी मी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण करीत आहे, असे म्हटले होते. तेच वाक्य या शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. तसेच, या ऑडिओ क्लिपमध्ये संयुक्त महाराष्ट्राबाबत राज ठाकरे यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्देही आहे. याशिवाय, संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ हे राज ठाकरे यांच्या भाषणातील वाक्य देखील ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त इंस्टाग्रामवर रील देखील बनवले आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचे हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी रिल स्टार अथर्व सुदामेसोबत महाराष्ट्र दिनानिमित्त खास व्हिडीओ बनवला आहे. या रिलमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्व आणि मराठी भाषा संवर्धनाविषयी भाष्य केले आहे.