लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागात वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतर रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ,त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला.
पथकांनी २६ टक्केघरांना भेटी दिल्यामाझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यासाठी राज्यात ५५ हजार पथके तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ५९ हजार पथके सध्या तैनात आहेत. ही पथके राज्यातील २६ टक्के घरांपर्यत पोहोचली असून ७० लाख ७५,७८२ घरांना भेटी दिल्या देऊन २.८३ लाख लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण पूर्ण केले. त्या पाहणीत ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच ७ लाख ५४ हजार कोमॉर्बिड लोक आढळले.
महाराष्ट्र के लोगबहादूर- पंतप्रधानयावेळी पंतप्रधानांनी देखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.
दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणारराज्यात दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढवीत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाºया काळात राज्यभर ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.