शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मायमराठीसाठी!

By admin | Published: February 27, 2017 9:55 AM

आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल,

 
बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ -  आज 27 फेब्रुवारी! मराठी राजभाषा दिन. सालाबादप्रमाणे मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने आज काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन होईल, सोशल मीडियावरही अगदी परवापासूनच मराठी दिनाच्या आगावू शुभेच्छा देणारे मेसेज फिरू लागले आहेत. तसे व्हॉट्स अॅप आल्यापासून अशा शुभेच्छांचा सुळसुळाट झालेला आहेच म्हणा.  त्यामुळे अशा शुभेच्छांमागे मराठीविषयी आत्मियता किती आणि औपचारिकता किती हा संशोधनाचाच विषय ठरावा. असो, 
 मराठी माणूस, मराठी भाषा यांचे संवर्धन हा आजच्या काळातील कळीचा विषय बनला आहे.  मराठी मरतेय, तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून आमच्यापैकी बरेचजण गळे काढत असतात, पण प्रत्यक्षात आपला मायबोलीसाठी कुणीच काही करत नाही. खेदाची बाब म्हणजे आज जागतिकीकरण आणि इंग्रजी व हिंदी भाषांच्या आक्रमणासमोर मराठी भाषा ही मराठी माणसाला ओझं वाटू लागली आहे, की काय अशी शंका येते. दुर्दैवाने मराठीविषयी मराठी माणसाच्याच मनात न्यूनगंड निर्माण झालाय! कार्यालयीन ठिकाणी सोडा पण आपापसात बोलतानाही मराठीत बोलणे मराठीजनांस कमीपणाचे वाटू लागलेय! सर्वात कहर म्हणजे आजच्या आया (सॉरी मॉम्स)
आपल्या वर्षा दोन वर्षाँच्या कोवळ्या लेकरांशीही बोबल्या इंग्रजीतून संवाद साधू लागल्या आहेत. बाकी फेसबुक, वॉटसअॅपवरही आपली 'पत' वाढवण्यासाठी इंग्रजीचा बेसुमार वापर करणारे बरेचजण आहेतच! आता अशाने मराठीचे संवर्धन कसे काय होणार? 
बरं स्वतःला मराठीचे रक्षणकर्ते समजणारे साहित्यिक, शिक्षक, राजकारणी यांची परिस्थितीही वेगळी नाही. मराठीच्या संगोपन, संवर्धनापेक्षा नसते वाद उकरण्यात यांना अधिक रस. त्यातूनच मग मराठीप्रेम व्यक्त करण्यासाठी दोन चार भैयांना झोडपले जाते. तोडफोड होते, गुजराती, मद्राशी यांच्यावर टीका केली जाते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, मराठी माणसाचे खच्चीकरण होत असल्याची भीती व्यक्त केली जाते, पण त्यातून मायमराठीला कितीसा आणि फायदा होणार? 
एकीकडे मराठी शाळा बंद पडताहेत म्हणून रडायचे आणि स्वतःच्या लेकरांना कॉन्व्हेंटमध्ये घालायचे, सभेत मराठीवर व्याख्यान झोडायचे आणि घरी, मित्रमंडळीत इंग्रजीतून गप्पा मारायच्या, वर मराठी ही ज्ञानभाषा नाही, जागतिक पातळीवर तिची फार पत नाही म्हणून नावे ठेवायची हे यांचे मराठीप्रेम! 
(शासकीय संकेतस्थळांना मराठीचे वावडे!)
(संगणकावर मराठीला प्राधान्य द्या)
(राज्य मराठी विकास संस्थेला पूर्णवेळ संचालक मिळेना!)
  •  
 
 
 
सध्या साहित्य आणि पत्रकारितेत बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यावरून वाद घातला जातोय. त्यातला एक गट बोलीभाषेसाठी आग्रही आहे, तर दुसरा प्रमाणभाषेसाठी. पण भाषा प्रवाही राहण्यासाठी भाषेत नवनवीन शब्द आलेच पाहिजेत, पण त्याचा अतिरेक होऊ नये!
एवढं वाचल्यावर आता तुम्ही म्हणाल, मग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करता येईल? खरंतर मराठीच्या रक्षणासाठी संवर्धनासाठी मोठं भव्यदिव्य काहीतरी करण्याची गरज नाही. केवळ आपापसांत मराठीतून संवाद साधल्याने, राज्यातील व्यवहारात, शासकीय कारभारात मराठीला अधिक चालना दिल्यास मराठीचा वापर वाढेल. आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. पण म्हणून आपल्या मुलांशी विनाकारण इंग्रजीतून संवाद साधण्याचीही गरज नाही. मातृभाषा ही शिक्षणाचा पाया असतो. ज्याचा हा पाया पक्का असेल तो पुढे कुठलीही भाषा आत्मसात करू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सुळसुळाट झाला असताना शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिशचा पर्याय उपलब्ध केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकेल. कार्यालयीन कामकाजात, रोजच्या प्रवासात, फुटपाथवरच्या परप्रांतीय व्यापा-यापासून ते लोकलमधल्या भांडणांपर्यंत आणि फेसबूकवरच्या स्टेटसपासून व्हॉट्सअॅपवरच्या गप्पांपर्यंत जेवढा मराठीचा वापर होईल, तेवढी मराठी वाढेल. हे खूप सोप्प आहे, पण मनावर कोण घेणार???