शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

हे न्हवं माझं सरकार ! विरोधकांची बॅनरबाजीतून सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 7:30 PM

‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’, अशा जाहिराती करीत  राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता.

नागपूर : ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’, अशा जाहिराती करीत  राज्य सरकारने तीन वर्षांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचा दावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या या जाहिरातबाजीची हवा काढण्यासाठी ‘बॅनरबाजीचा’ आधार घेतला आहे. ‘हे न्हवं माझं सरकार’ या टॅगलाईनखाली गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कामाचे वाभाडे काढणारे बॅनर्स विरोधकांनी झळकविले आहेत. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रविभवनातील कॉटेजच्या परिसरात एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी ठरले, याचा सचित्र आलेख मांडत सरकारला सवालही विचारण्यात आले आहेत. कर्जमाफी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यासारखे मुद्दे घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर फोकस करण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यांची खिल्लीही उडविण्यात आली आहे. सरकारने केलेली जाहिरातबाजी, सरकारच्या कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकºयांपर्यंत पोहचलेली नाही,  राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासह  ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाºयांना मिळते क्लीनचिट’ असे लिहून मंत्र्यांच्या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी विरोधक विधिमंडळावर जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानिमित्त शहरात लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनर, पोस्टरवरही संबंधित मुद्यांवर फोकस करण्यात आला आहे. 

विरोधकांच्या बॅनरवरील काही मुद्दे 

- भाजपाने निवडणुकीत दिला होता नारा, अजूनही झाला नाही सातबारा कोरा

- सरकारच्या अन्यायाचा झाला कहर, जगाचा पोशिंदा रोज पितो जहर

- कवडीमोल भावाने गेले सोयाबीन, हेच का तुमचे अच्छे दिन

- फसव्या कर्जमाफीचे बोगस सन्मानपत्र, भाजप-सेना सरकारने वाटले अपमानपत्र

- टप टप टप गळाली लाखमोलाची संत्री, हाल विचारायला आले नाही एकही मंत्री