शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

'...त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालेलं', दिशा सालियानप्रकरणी आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं, लोकेशन सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 1:13 PM

ज्यादिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं हे आपल्या सर्वांना ठावूक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

नागपूर-

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जात असताना आता पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनीच दिशाचा मृत्यू झाला तेव्हा आपण कुठे होतो याबद्दल भाष्य केलं आहे. ज्यादिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं हे आपल्या सर्वांना ठावूक आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते नागपूरात विधानभवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली जातेय असं आदित्य यांना विचारलं असता त्यांनी पहिल्यांदाच आपण त्यादिवशी कुठं होतो याची माहिती दिली आहे. "दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. याची तुम्हालाही माहिती आहे. मी त्यादिवशी अर्थात तिथं होतो. मी सत्य बोलायची ताकद ठेवतो आणि हे सरकार अशाच लोकांना त्रास देण्याचं काम करत आहे. तुम्ही पाहिलं असेल की जितेंद्र आव्हाड असो किंवा संजय राऊत असो सत्याच्या बाजूनं उभं राहणाऱ्यांना त्रास दिला जातोय. उद्या तुम्हा पत्रकारांनाही सतावलं जाईल", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

आम्हीच पट्टेरी वाघ, मिंधे सरकारचे पट्टे पुसले गेलेसत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे प्रतिमेला डाग लागले जात आहेत असं विचारलं गेलं असता आदित्य ठाकरेंनी मिंधे सरकारचं मांजर झाल्याचं म्हटलं. "डाग वगैरे काही नाही. आम्ही पट्टेरी वाघ आहोत आणि मिंधे सरकारचे पट्टे पुसले गेले असून त्यांची मांजर झाली आहे. एका ३२ वर्षांच्या तरुण आमदाराला मिंधे सरकार घाबरलं आहे. मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर असून त्यांचा राजीनामा घेईपर्यंत लढत राहणार असा निर्धार आम्ही केला आहेठ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे