शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर! माझा नवरा येऊन...; सुप्रिया सुळेंचा अजित दादांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 4:01 PM

यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत...

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी राज्यातील सर्वच इच्छूक नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. आपापल्या मतदार संघात त्यांचे दौरेही सुरू झल्याचे दिसत आहे. मात्र, यावेळी राज्यातील बारामती मतदार संघावर आतापासूनच सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि जनतेला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना लक्ष्य केले आहे. 

माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर -सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला हवं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. नवऱ्याचं काय काम इकडे? आमचे लग्न म्हणजे आती क्या खंडाला. काय इकडे तिकडे नाही जायचं. तुम्हाला असं पाहीजेल, जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार आहे. नवऱ्याने कॅन्टिनमध्ये बसायचं. माझा नवरा येत नाही. पण, ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्याने यांचं पार्लमेंटमध्ये आणि बायको आत गेली की बसायचं कँटिनमध्ये पर्स घेऊन." सुप्रिया यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हाशा उडाला. यावर सुप्रिया म्हणाल्या चेष्टा नाही, सिरियस, मी चेष्टा करत नाहीय. 

तुम्हाला कसा हवाय खासदार?पार्लमेंटमध्ये  मध्ये नोट पॅड लागतो मॅडम पर्स नाही लागत. पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत. तिथे नोट पॅड पेन अथवा आय पॅड लागतो, मग पार्लमेंटमध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या भागामध्ये कुठेही अलाऊड नसते. कँटिनमध्ये बसा. मग तुम्हाला कसा हवाय खासदार, तिथे बोलणारा हवा की नवरा बोलणारा हवाय? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील. द्याल का मला मतं? कुणाकडे बघू मत देणर? मी की सदानंद सुळे? जाणार कोण तेथे? त्यामुळे विचार करून मतदान करा. सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केलं, तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोसायचे आहे. तेथे जाऊन विषय मला मांडायचे आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक