पुणे: मला मान-सन्मानाच्या पलीकडे काम करण्याची इच्छा आहे़ कारण शहरात चार भिंतीमध्ये आरामात राहणारे आपण शहराबाहेर काय अवस्था आहे याबाबत अनभिज्ञ असतो़ सर्वसामान्यांजवळ औषधासाठी देखील पैसे नाहीत. डोळयांने शेतकऱ्याची विधवा पोर पाहिली की जीव कासाविस होतो म्हणूनच माझ्यातील माणूस जिवंत रहाण्यासाठी मी ‘नाम’ फौंडेशनच काम करतोय, अशा भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या़ प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते़ सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नाना पाटेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ भगवान निळे, मोहन कुं भार, विष्णु थोरे या कवींना गौरवण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, माजी आमदार उल्हास पवार, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, विजय ढेरे, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे उपस्थित होते़नाना पाटेकर म्हणाले, अंबानी मला म्हणाले की दीडशे कोटी देतो, पण मला ते नकोत तुमच्या घामाचा एक-एक रुपया मला हवा आहे. नाम हे ना मकरंदचे आहे ना माझे हे आपल्या सर्वांचे आहे. पाटील म्हणाले, उसवलेलं जीण माहीत नाही. ते काय असतं ते नानाने दाखवलं. नानाच्या ‘नाम’ ने विश्वासाहर्ता जपली आहे, म्हणूनच सरकारही त्यांना मदत करायला तयार आहे़ (प्रतिनिधी)तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे आतापर्यंत २९ क ोटी जमा झाले आहेत. मागच्याच पंधरा दिवसात १ क ोटी २० लाख रुपये जमा झाले आहे. माणसाने म्हंटले तर खुप होऊ शकते म्हंटले तर काहीच नाही. राजकारणी हे सगळे माझे मित्र आहेत़ कारण त्यांच्याकडे मी कधी हात पसरवले नाहीत. ज्या दिवशी काही मागण्यासाठी हात पसरवेऩ त्यादिवशी मैत्री संपुष्टात येईल. यालाच किंमत कमी करुन घेणे म्हणतात आणि अजून ही माझी किंमत जशीच्या तशी आहे. अजून माझी किंमत ठरलेली नाही जर लिलावात काढायचे झालेच तर शेतकऱ्यांसाठी काढेन मग लावा बोली काय लावायची ती..- नाना पाटेकर
माझ्यातील माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड - नाना पाटेकर
By admin | Published: March 13, 2016 1:44 AM