शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:26 PM

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला.

मुंबई - अभिनेत्री काजोलने आई तनुजाच आपली खरी स्टाईल आयकॉन असल्याचं सांगितलं आहे. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपली आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याबद्दल बोलताना काजोल थोडी भावूक झालेली पहायला मिळाली. 

'आईचे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. कारण त्यानेळी हजारो मुलं माझ्या आईला आई बोलत होती आणि ते मला आवडत नसायचे. त्यामुळे मी आईचे चित्रपट पाहिले नाहीत', अशी आठवण काजोलने शेअर केली.  आईची स्टाईल इतरांपेक्षा वेगळीच होती, आणि ती माझी आवडती आहे असंही काजोलने सांगितलं. स्टाईल हा शब्द फक्त कपड्यांपुरता मर्यादीत नाही. प्रत्येक गोष्टीत स्टाईल करायला आवडते असं काजोलने सांगितलं. 

विशेष म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांनी काजोल देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला. सोबतच आशिकी चित्रपटातील गाणंही गायलं.

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

ट्रॉफीही स्टायलिशमहाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही. 

टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७