शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

माझा मर्डर प्लान परफेक्ट होता

By admin | Published: September 06, 2015 1:30 AM

शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला

मुंबई : शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला होता. शीनाच्या हत्येचा अचूक कट तिने आखला होता. हत्येशी संबंधीत सर्व पुरावेही नष्ट केले होते आणि शीनाचे अस्तित्वही जिवंत ठेवले होते. त्यामुळे शीनाची हत्या पचवल्याचा आत्मविश्वास होता, असे इंद्राणीने पोलिसांना सांगितले आहे.शीनाच्या हत्येनंतर पुढल्याच महिन्यात मिखाईलच्या हत्येचा कट आखला होता. मिखाईलची हत्याही शीनाप्रमाणेच केली जाणार होती. शीतपेयातून गुंगी आणणारे औषध मिसळून मिखाईलला बेशुद्ध करायचे. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करायची, असे ठरले होते. या गुन्ह्यातही दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय हे दोघे इंद्राणीला सहकार्य करणार होते. मिखाईलची हत्या कोलकात्यात केली जाणार होती, अशी माहिती समोर आली आहे. पीटर यांना क्लीनचीट मिळण्याची शक्यताइंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांना पोलिसांकडून क्लीनचीट मिळण्याची शक्यता आहे. शीनाच्या हत्येनंतर इंद्राणीने हॉटमेलवर शीनाच्या नावे बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून इंद्राणीने पीटर यांनाही ईमेल पाठवले होते. शीनाच्या अचानक गायब होण्याबाबत पीटर यांचा मुलगा राहुलने इंद्राणीवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून पीटर व इंद्राणी यांच्यात वाद सुरू झाले. शीना अमेरिकेत सुखरूप आहे, असे भासवून पीटर यांच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी इंद्राणीने बनावट ईमेलची शक्कल लढवली होती. हेच ई-मेल आता पीटर यांचा मुख्य बचाव ठरत आहेत. शीनाची हत्या झाल्याचे मला माहीत असते तर इंद्राणीने मला बनावट ई-मेल का पाठवले असते, असा सवाल पीटर यांनी खार पोलिसांसमोर उपस्थित केल्याची माहिती मिळते. तीन महत्त्वाचे ईमेल पोलिसांच्या हातीइंद्राणीच्या जी-मेल अकाउंवर ८ मार्च २०१२, ४ मे २०१२ आणि ७ आॅगस्ट २०१२ या तीन तारखांना आलेले ईमेल पुरावा म्हणून पंचनामा करत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.ड्रायव्हरचा प्रत्यक्ष सहभाग उघडशीना बोरा हत्याकांडाची उकल झाल्यानंतर इंद्राणीचा चालक श्याम राय याला पोलीस माफीचा साक्षीदार करतील असे संकेत होते. हत्येत सहभाग नव्हता, असा दावा तो करत होता. मात्र चौकशीत शीनाचे हातपाय श्यामने पकडले होते. त्यामुळेच संजीव खन्ना तिचा गळा आवळू शकला, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी श्यामच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांना त्याचा वाहनचालकाचा परवाना आणि शीनाचा फोटो सापडला. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर शीना जिवंत आहे असा आभास निर्माण करण्यातही श्यामने इंद्राणीला मदत केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.शीना व राहुल मरोळ परिसरात भाडयाने राहात होते. हत्येनंतर शीनाच्या बनावट सही असलेला भाडेकरार व अन्य कागदपत्रे फ्लॅट मालकाकडे इंद्राणीने पोहोचवले. ही कागदपत्रे श्यामने पोचवली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस श्यामला माफीचा साक्षीदार करतात का, या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हत्येआधी क्रेडिट कार्डांवरून खरेदीशीना बोरा व मिखाईल यांच्या हत्येचा कट आखण्यासाठी तसेच प्रत्यक्ष हत्येसाठी आवश्यक असलेल्या वस्तू इंद्राणीने आपल्या क्रेडिट कार्डांवरून खरेदी केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुळात इंद्राणीकडे एकूण १४ क्रेडीट कार्डे आहेत. त्यापैकी काहींद्वारे ब्रिटेनवरून खरेदी केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.संजीवचा भागीदार, अंगरक्षकाची चौकशी सुरूइंद्राणीचा दुसरा पती व शीना बोरा हत्याकांडातील आरोपी संजीव खन्ना याच्या व्यावसायिक भागीदाराला खार पोलिसांनी पाचारण केले आहे. त्यानुसार हा भागीदार शनिवारी मुंबईत आला असून त्याची खार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शीना हत्येत सहकार्य केल्याबददल इंद्राणीने संजीवला मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली. याच मदतीच्या जोरावर संजीवने कोलकात्यात हॉटेल व्यवसाय सुरू केला, असा संशय पोलिसांना आहे. त्याच दृष्टीने पोलीस संजीवच्या भागिदाराकडे चौकशी करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोलकात्याहून संजीवच्या अंगरक्षकालाही बोलावणे धाडले होते. शनिवारी त्याचीही चौकशी पोलिसांनी केल्याचे समजते.