हा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो. तेव्हा त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. सहाजणच राहिले होते. मी त्या पाच लोकांचा नेता राहिलो होतो. पाच लोकांसोबत मी पुन्हा पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुढची जी निवडणूक झाली ती आमची संख्या ७९ वर गेली. संख्या नुसतीच वाढली नाही, तर जे पक्ष सोडून गेलेले त्यापैकी तीन ते चार सोडले तर सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहिल. माझा राज्यातील जनतेवर प्रचंड विश्वास आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत असेच चित्र होते. आमची भूमिका महाराष्ट्रभर जाऊन मांडली म्हणून एवढे आमदार निवडून आले होते, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
जो काही प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाहीय. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी साताऱ्यात एक मेळावा घेणार आहे. त्यानंतर राज्यात जेवढ्या लोकांना भेटता येईल हीच माझी उद्यापासूनची निती असणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता, आमचे काही मतभेद झाले. त्यामुळे पक्ष स्थापन केला. कुणी काहीही करो आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू असे शरद पवार म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा कधी दिला ते मला माहिती नव्हते. पक्षाचे नाव घेऊन कोणी काहीही भूमिका घेतली असेल तर आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांसमोर जाऊ, असे पवार म्हणाले.
शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबत का नाही, या प्रश्नावर ही त्यांची निती असेल पण राष्ट्रवादीच्या नितीशी ही पटणारे नाही. राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, तो काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांचा असू शकतो, असे ते म्हणाले.
राज्यातील कार्यकर्त्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यांची अस्वस्थता झाली असणार. आम्हाला निवडून देतात, आम्ही सांगू ती भूमिका मांडतात. ते अस्वस्थ होणार, त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटना बांधावी लागणार आहे. ते मी आणि तरुण कार्यकर्ते करू, असे पवार म्हणाले.
पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतली. जयंत पाटील आदींशी चर्चा करावी लागेल. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही. यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल, असा इशारा पवार यांनी दिला.