काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 08:00 PM2019-03-24T20:00:45+5:302019-03-24T20:08:15+5:30

वसंतदादा गटाच्या मेळाव्यात पाटील यांनी ही घोषणा केली.

My relationship with Congress party ended: Pratik patil | काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी

काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी

googlenewsNext

सांगली : वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला साताऱ्यानंतर शेजारच्या सांगलीमध्येही मोठा धक्का बसला आहे. 


काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील साखर कारखान्याद्वारे समाजकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी वसंतदादा गटाच्या मेळाव्यात सांगितले. यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नाही. यापुढे फक्त समाजकारण करणार आहे.

काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे. म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. यापुढे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे.
पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर आमचे बंधू विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, असे त्यांनी सांगितले.

तर विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक. नाहीतर अपक्ष लढणार, असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

Web Title: My relationship with Congress party ended: Pratik patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.