लाळ्या, खुरकूत रोगाशिवाय मोठ्या जनावरावरील घटसर्प, फऱ्या तसेच शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर, आंत्रविषार आदी रोगावर नियंत्रणासाठी विविध रोगांचे प्रतिबंधक लसीकरण केले जाते. या लसीकरणामुळे सांसर्गिक रोग प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली.
या योजनेची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे, जनावरांचे विविध रोग प्रादुर्भाव, त्या अनुषंगाच्या उपाययोजना, सर्वेक्षण करणे, लसीकरण आदी बाबतची माहिती देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले जाते.
याशिवाय जनावरांमध्ये अचानक उद्भवणारे रोग जसे की, बर्ड फ्ल्यू, इक्वाईन इनफल्युंझा, स्वाईन फ्ल्यू या रोगाचा प्रादुर्भाव, उपाययोजना, सर्वेक्षण याबाबतची माहिती पशुसंवर्धन विभागातील तसेच इतर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनुषंगिक शास्त्रीय माहितीबाबत अवगत करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही केली जाते.
यासाठी दरवर्षी दोन कार्यशाळा घेण्यात येतात. याबाबीसाठी केंद्र शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते.