शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:38 AM

शहीद रोमित यांना अखेरचा निरोप

शिगाव : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २३) यांच्या पार्थिवावर शिगाव (ता. वाळवा) येथे शासकीय इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘शहीद जवान रोमित चव्हाण अमर रहेऽऽ’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव पुण्याहून सकाळी पावणेसातच्या सुमारास शिगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी ‘अमर रहे... अमर रहे... रोमित चव्हाण अमर रहे..’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. पार्थिव प्रथम त्यांच्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाइकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजविलेल्या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. वारणाकाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. 

‘एकुलता एक मुलगा देशाच्या कामी आला’ वीरपिता तानाजी चव्हाण म्हणाले, आज रोमित आम्हाला सोडून गेला, याचं दुःख कधीच न भरून येणारं आहे; पण माझा एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी कामी आला, हा अभिमान हे दुःख पचवायची ताकद देत आहे. माझा वाघ जाताना शिगावचं नाव भारतात करून अमर झाला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान