शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

जलजागृती सप्ताहातच ‘पेयजला’साठी माय-लेकींचा बळी

By admin | Published: March 17, 2016 10:57 PM

धरणामुळे गावाशी संपर्क तुटला , येळवण वा रिंगणे हे ७ किलोमीटरचे अंतर मुलांना शाळेत जावे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी ओझर -धनगरवाडीला संघर्ष

आनंद त्रिपाठी--वाटूळ  -राज्यभरात जलजागृती सप्ताहाची सुरुवात होत असतानाच पिण्याच्या पाण्यासाठी राजापूर तालुक्यातील ओझर धनगरवाडीमधील मायलेकींचा बळी गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी ओझर - धनगरवाडीमध्ये घडली.ओझर -धनगरवाडी ही गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर वसली आहे. वाडीमध्ये तीस घरे असून, २५०च्या आसपास या वाडीची लोकसंख्या आहे. डोंगरमाथ्यावरील तीन किलोमीटर परिसरात ही ३० घरे वसली असून, या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर खाली उतरुन तेथील धरणातून पाणी घेऊन जावे लागते. पाण्यासाठी दोन किलोमीटरचा डोंगर उतरावा व चढावा लागतो. शासनाने धरण डोंगरपायथ्याशी बांधले. परंतु, त्याच डोंगरावर राहणाऱ्या ३० घरांमधील लोकांना पिण्याच्या पाण्याची कसलीही सोय उपलब्ध केली नाही. ग्रामपंचायतीकडे यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील पाण्याचा कोणताही बंदोबस्त झाला नसल्याची खंत या दुर्दैवी घटनेनंतर धनगरवाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. एवढी मोठी घटना होऊन देखील ग्रामसेवक याठिकाणी साधे फिरकले देखील नाहीत याबाबत वाडीमध्ये असंतोष होता.या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मनिषा कोकरे यांना ५ मुली व १ मुलगा असून, घरातील वृद्ध सासू-सासऱ्यांच्याही त्याच आधार होत्या. पती महादेव कोकरे घटनेच्या दिवशी मजुरीसाठी बाहेर गेले होते. सकाळची शाळा करुन मनिषा कोकरे यांच्या तीन मुली पिण्याचे पाणी आणण्यासाठी धरणावर गेल्या. पैकी दोन मुली पाण्याची एक खेप घेऊन पुन्हा घराजवळ आल्या व त्यातील नववीमध्ये शिकणारी मुलगी स्वाती पुन्हा धरणावर आली. यावेळी धरणाजवळच आई मनिषा या शेळ्या राखत होत्या. धरणाजवळ पाणी भरणारी संगिता (१२) ही पाण्यात पडली. आईने हे पाहताच लागलीच उडी घेतली. संगीताने आईला घट्ट मिठी मारल्याने त्या दोघीही पाण्यात बुडाल्या. भरलेली भांडी ठेऊन स्वाती तेथे आली असता तिच्या डोळ्यासमोर ही दुर्दैवी घटना घडली. आईच्या व बहिणीच्या जाण्याने संपूर्ण कोकरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ४ मुली व बारावी झालेला मुलगा, वृद्ध आई-वडील या सर्वांची जबाबदारी आता मजुरी करणाऱ्या महादेव कोकरे यांच्यावर पडली आहे.ओझर गावातील धनगरवाडीमध्ये जाण्यासाठी रस्तादेखील नाही. धरणामुळे गावाशी या वाडीचा संपर्क तुटला असून, येळवण वा रिंगणे हे ६ ते ७ किलोमीटरचे अंतर पार करुन मुलांना शाळेत जावे लागते. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतरही जीवनावश्यक गरज असणाऱ्या पाणी, रस्ता, शिक्षण या सर्वांसाठी आजही ओझर -धनगरवाडीला संघर्ष करावा लागत आहे. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झोरे व संघटक अनंत झोरे यांनी ही समस्या सरपंचांसमोर ठेवली असून, पाण्यासाठी आमच्या समाजबांधवांना जीवघेणा संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुर्दैवी घटना घडली असताना शासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नाही.धनगरवाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करु, अशी ग्वाही या दुर्दैवी घटनेनंतर सरपंच अंजली राजकुमार कुर्ले यांनी दिली आहे.मृतदेहाला अग्नी देऊन आल्यानंतर मुलाला आंघोळीसाठी पाणी नाही. पिण्याचे पाणी आजूबाजूच्या घरातून दिले जात होते.पोलीसपाटील विलास कुर्ले यांनी अत्यंत तत्परतेने हे प्रक़रण हाताळले. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्वांमध्ये समाधान होते.२५० ग्रामस्थ असलेल्या ओझर धनगरवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागतोय जीवघेणा संघर्ष.मेहनती मनिषाच्या जाण्याने कोकरे कुटुंबीय उघड्यावर.ओझर धरणापासून २ किलोमीटर चढ्या डोंगरावरील ३ किलोमीटर परिसरात वसली आहे धनगरवाडी.