शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

२५० कोटींच्या हिशेबाचे गूढ अद्याप कायम

By admin | Published: April 01, 2016 12:34 AM

आमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची संपत्ती आज जप्त करण्यात आली असली तरी या शिवाय अण्णाभाऊ साठे महामंडळातील महाघोटाळ्यांची किमान २५० कोटी रुपयांची

- यदु जोशी,  मुंबईआमदार रमेश कदम यांची १२० कोटी रुपयांची संपत्ती आज जप्त करण्यात आली असली तरी या शिवाय अण्णाभाऊ साठे महामंडळातील महाघोटाळ्यांची किमान २५० कोटी रुपयांची रक्कम नेमकी गेली कोणाच्या खिश्यात हे गूढ अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ आमदारांच्या मतदारसंघांमध्ये १९० कोटी रुपयांची खैरात वाटण्यात आली होती. प्रत्येकी पाच कोटी रुपये मातंग समाज महिला समृद्धी योजनेंतर्गत वाटण्यात आले. यात बहुतेक प्रकरणे बोगस बनवून पैसा लाटण्यात आला. या पैशांच्या एकाही लाभार्थीवर अद्याप सीआयडीने कारवाई केलेली नाही आणि एक पैसाही जप्त केलेला नाही. सूत्रांनी सांगितले की ही कारवाई झाली तर अनेक जण गजाआड जावू शकतील आणि त्यात बरीच धक्कादायक नावे असतील. महामंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांमधून ५६ कोटी रुपये आरटीजीएसने काढण्यात आले. ही रक्कम कुठे गहाळ झाली हे अद्याप कळायला मार्ग नाही. वेगवेगळ्या खात्यांमधून या रकमेचा झालेला प्रवास नेमका कोणाच्या खात्यांमध्ये थांबला हे समोर आले तर घोटाळ्याची पाळेमुळे उखडून काढण्यास मदत होणार आहे. महामंडळात कोणतीही मुलाखत न घेता, अर्जही न घेता ८५ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले. या संपूर्णत: बेकायदेशीर नियुक्त्या होत्या. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीन महिने आधी दाखविण्यात आली आणि त्यांना गृहबांधणी कर्जापोटी प्रत्येकी २० लाख रुपयांचे कर्ज महामंडळाच्या कर्मचारी कल्याण निधीतून देण्यात आले. या पैशांची वसुलीही अद्याप व्हायची आहे. हा पैसा रमेश कदम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उकळला असा आरोप आहे. महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना देतानाही पैसा खाण्यात आला. पैशांची खैरात बारामती आणि मोहोळ येथील दोन दूध संघाना प्रत्येकी साडेपाच कोटी रुपयांची खैरात वाटण्यात आल्याचे प्रकरणही धक्कादायक होते. मातंग वा अन्य कोणत्याही मागास जातीचे संचालक नसलेल्या या संस्थांवर वित्तकृपा करण्यात आली. कदमच अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना १४२ कोटी रुपये वाटण्यात आले.