क-हाड (जि. सातारा) : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, असे स्वप्न त्यांनी पाहिले. तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली. कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्यानंतर एन. डी. पाटील यांनी कृतीतून करून दाखविले,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.कºहाड येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयात सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ शरद पवार यांच्या हस्ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील व पत्नी सरोजताई पाटील यांना प्रदान करण्यात आला. खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल काकोडकर, राम खांडेकर, अरुण गुजराथी, ज्येष्ठ लेखक जब्बार पटेल, आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने उपस्थित होते. यावेळी राम खांडेकर लिखित ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.सत्काराला उत्तर देताना एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. पुरस्कारासाठीपोटी मिळालेल्या दोन लाखांपैकी एक लाख रुपये रयत शिक्षण संस्था आणि एक लाख रुपये इचलकरंजी येथे वाचनालय इमारतीसाठी देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादनआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी सोमवारी शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.
कर्मवीरांचे स्वप्न एन. डी. पाटील यांनी पूर्ण केले - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:22 AM