सांगली : यंदाचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार असल्याची माहिती येथील विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर यांनी सोमवारी दिली. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या १९ वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. (प्रतिनिधी)
एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’ पुरस्कार
By admin | Published: January 10, 2017 4:21 AM