सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदीद्वारे जमिनी घेण्यास नाशिक जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. सिन्नर तालुक्यातील १२ शेतकºयांच्या शेतजमिनी शासनाने खरेदी केल्या. शेतकºयांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करण्यात आले आहे.समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यासाठी सिन्नर तालुक्याचे बागायती क्षेत्र असणाºया पश्चिम भागात तीव्र विरोध करण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील १२ शेतकºयांनी शासनाला जमिनी दिल्या.१६ गुंठे जमीन देणाºया वावी येथील बिजलाबाई कृष्णाजी लांडगे या वृद्ध शेतकरी महिलेचा महसूल आयुक्त महेश झगडे व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मूल्यांकनानुसार सुमारे २८ लाख ७६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाल्याची माहिती प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली.वावी येथील चार, सायाळे येथील तीन, धोंडवीरनगर येथील दोन, तर दुशिंगपूर, सोनांबे, दातली या गावांतील १२ शेतकºयांनी शासनाला थेट खरेदीद्वारे जमिनी दिल्या.सुमारे ८०० कोटी लागणारसिन्नर तालुक्यातील २६ गावांमधून सुमारे ७९७ हेक्टर क्षेत्र समृद्धी महामार्गासाठी लागणार आहे. सुमारे ६१ किलोमीटर मार्गासाठी तालुक्यातील सुमारे ७९७ हेक्टर खरेदीसाठी ७०० ते ८०० कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज तहसीलदार गवळी यांनी व्यक्त केला.
नाशिकला ‘समृद्धी’साठी जमिनी खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:01 AM