लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोगेश्वरीचा नबी अहमद शेख हा गेल्या १२ वर्षांपासून पाकिस्तानातच असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच तेथे तो आयएसआयसाठी काम करत असल्याच्या माहितीने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) याचा अधिक तपास करत आहे. नबी शेखला कागदपत्रांतील त्रुटींमुळे पाकिस्तानने इस्लामाबाद येथून अटक केली. २००२-०३ मध्ये मुंबईत विलेपार्ले, गेट-वे आणि झवेरी बाजार, घाटकोपर येथील बेस्ट बसथांबा, मुलुंड स्थानकात शिरणारी लोकल यात बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटांमध्ये सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट आॅफ इंडिया) या संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यासंदर्भातील चौकशीसाठी तपास यंत्रणांनी मुंबईतून विशेषत: सिमीचे अस्तित्व असलेल्या भागांमधून अनेक तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत शेखचे नाव पुढे आले होते. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. २००५ नंतर तो गायब झाला. तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात गेला. तेव्हापासून तो तेथेच राहत असून आयएसआयसाठी काम करत असल्याचे समोर येत आहे.
मुंबईचा नबी शेख आयएसआयचा एजंट
By admin | Published: May 26, 2017 4:31 AM