शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

लोकसहभागातून ‘नद्याजोड’!

By admin | Published: March 14, 2016 2:37 AM

केवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले

गणेश धुरी,  नाशिककेवळ एका दिवसात लोकसहभागातून पाटचारी खोदून त्याद्वारे दोन नद्या जोडून जिल्ह्यातील १० गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. सरकारच्या भरवशावर न बसता गावकऱ्यांनी टिकाव-फावडे हातात घेतले अन् बघता बघता पाटचारी पूर्ण होऊन कोरड्याठाक नदीत पाणी अवतरले. बागलाण तालुक्यातील जोरण, विंचुरेसह परिसरामधील गावांतील ग्रामस्थांनी एका दिवसात ५०० मीटर पाटचारी खोदली. त्यामुळे १० गावांचा पिण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला.कपालेश्वर गावाजवळील हत्ती नदीला गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणीच नसल्याने पात्र कोरडे पडले होते. पठावे लघुसिंचन प्रकल्पातून हत्ती नदीला पाणी येते. तो प्रकल्पच कोेरडाठाक असल्याने नदीला पाणीच नव्हते. कपालेश्वर, किकवारी, विंचुरे व जोरणच्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्याकडे आरम व हत्ती नदी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र आरम नदीतील पाणी थेट हत्ती नदीत आणण्यासाठी अनेक परवानग्या लागणार हे गृहीतधरून पाटील यांनी पाटचारी खोदण्यासाठी लोकसहभागाची संकल्पना मांडली; तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.दुसऱ्याच दिवशी जेसीबी, इतर यंत्रसामग्रीसह दोनशे ग्रामस्थांनी हाती टिकाव-फावडे घेत पाटचारी खोदकामास सुरुवात केली आणि एका दिवसात काम पूर्ण केले. पाटचारीत सुमारे २४ पाइप टाकण्यात आले. गावकऱ्यांनी पदरमोड करून हा नद्याजोड प्रकल्प साकारला. अनिल पाटील यांनी त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून केळझर धरणातून ५५ दलघफू पाणी हत्ती नदीत सोडण्यासाठी हिरवा कंदील मिळविला. त्यामुळे २७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान हत्ती नदी खळाळून वाहिली. शासकीय निधीची वाट पाहत न बसता वीरगाव गटात लोकसहभागातून जवळपास १२ ते १३ प्रकारची विविध कामे करण्यात आली आहेत. त्यात आरम-हत्ती नद्या जोडण्यासाठी पाटचारी खोदण्यासह नालाबांध, नाला खोलीकरण व रुंदीकरण कामे केली. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याबरोबरच भूजलपातळीत वाढ झाली आहे.- प्रा. अनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्य, बागलाण