शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Nagar Panchayat Election Result 2022: सर्वाधिक नगरपंचायतीत राष्ट्रवादी; भाजपची जाेरदार मुसंडी; काँग्रेसला चांगलं यश, शिवसेना चौथ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 7:26 AM

तरुण चेहऱ्यांना मिळाली संधी; काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का; महाविकास आघाडीला राज्यात सर्वाधिक जागा

मुंबई : निमशहरी महाराष्ट्राचा भाग असलेल्या राज्यातील १०६ नगर पंचायतींपैकी ९७ पंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले. मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला तुलनेने फटका बसला आणि तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तर मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर फेकली गेली.भाजपने २२, काँग्रेस २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे. सर्वाधिक ३८४ जागा भाजपने जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ३४४, शिवसेनेने २८४ तर काँग्रेसने ३१६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे.भंडारा जि.प.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या. तेथे भाजपला फटका बसला. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सरशी झाली. अपक्ष, स्थानिक आघाड्या, इतर लहान पक्षांनी १६ नगर पंचायतींमध्ये सत्ता संपादन केली. बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केज वगळता चार ठिकाणी पॅनल उभे केले होते. त्यात तीन पंचायतींत सत्ता मिळविली असून, मंत्री धनंजय मुंडे गटाला धक्का बसला आहे.मिस यू आबा... रोहित पाटील गहिवरलेसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकवत दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली. या विजयानंतर आर. आर. आबांच्या आठवणींनी रोहित यांना गहिवरून आले. आबांना नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असे सांगत रोहित यांनी मतदारांचे आभार मानले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात, ‘निवडणूक निकालानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही’,‘मी आता २३ वर्षांचा आहे, पंचवीशीचा होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवणार नाही,’ असे सांगत भावनिक सादही त्यांनी घातली होती. त्यावर विरोधकांनी त्यांना बालिश म्हणत हिणवले होते.विजयाचे शिलेदारअर्धापूर : अशोक चव्हाणतिवसा : यशोमती ठाकूरघनसावंगी : राजेश टोपेसिंदेवाही : विजय वडेट्टीवारसोयगाव : अब्दुल सत्तारम्हसळा : सुनील तटकरेपोंभुर्णा : सुधीर मुनगंटीवारकवठे महांकाळ : रोहित पाटीलकर्जत : रोहित पवारकडेगाव : संग्राम देशमुखदेहू : सुनील शेळकेपाटण : सत्यजित पाटणकरसंग्रामपूर : बच्चू कडूदोडामार्ग, वैभववाडी : नीतेश राणेकोरेगाव : महेश शिंदेबोदवड : चंद्रकांत पाटीलआष्टी पाटोदा : सुरेश धसमाळशिरस :   मेहिते पाटीलदिग्गजांना धक्कारावसाहेब दानवे धनंजय मुंडे शशिकांत शिंदे गोपीचंद पडळकरसंजयकाका पाटीलप्रा. राम शिंदे ॲड. के. सी. पाडवी रजनी पाटीलसंभाजी निलंगेकर जयंत पाटील एकनाथ खडसेरामदास कदम शंभूराज देसाई विश्वजित कदमविदर्भात महाआघाडी सरस : अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये १२ नगरपंचायतीमध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली वगळता महाआघाडी सरस राहिली. अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत यशोमती ठाकूर यांनी एकहाती वर्चस्व राखले, तर भातकुली नगरपंचायतीत आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पक्षाने १७ पैकी ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा