माथेरान : येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांनी बुधवारी (८ जून) अलिबाग येथे रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. यावेळी माथेरान विकास आघाडीचे गटनेते अजय सावंत उपस्थित होते. माथेरान नगरपरिषदेमध्ये विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत आहे. आघाडीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी वेगळी चूल मांडली तरी आघाडीकडे बारा सदस्यांचे पाठबळ असल्याने नवी निवडणूक ही केवळ औपचारिकता असणार आहे. ६ तारखेला उपनगराध्यक्ष सुनीता पेमारे यांनी अध्यक्ष गौतम गायकवाड यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनी तो मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. स्वत:चा राजीनामा देखील सादर केला. माथेरानचे नगराध्यक्षपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी आता वंदना शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने नवीन नगराध्यक्षांना विकासकामांना गती देण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. (वार्ताहर)पक्षांतर्गत धोरणानुसार दिव्या डोईफोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अकरा महिन्यांसाठी माथेरान विकास आघाडीने या पदावर काम करण्याची संधी दिली. माझा कार्यकाळ समाप्त झाल्याने मी राजीनामा दिला आहे.- गौतम गायकवाड, माजी नगराध्यक्ष, माथेरान६ तारखेला उपनगराध्यक्ष सुनीता पेमारे यांनी अध्यक्ष गौतम गायकवाड यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनी तो मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.
नगराध्यक्ष गायकवाड यांचा राजीनामा
By admin | Published: June 10, 2016 3:06 AM