शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

नागपूर, गोंदियात भाजपाला यश

By admin | Published: January 10, 2017 4:24 AM

चौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे.

नागपूर : चौथ्या टप्प्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे. सात नगराध्यक्ष पदांसह सर्वाधिक जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेस आणि इतरांना दोन नगराध्यक्ष पदं मिळाली. चौथ्या टप्प्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.नागपूर जिल्हात भाजपा आमदारांचे प्रस्थ पाहता ९ पैकी ७ ते ८ जागी भाजपचे नगराध्यक्ष विजयी होतील, अशी अपेक्षा असताना ५ ठिकाणीच भाजपला यश आले. कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तर काटोल, नरखेडमध्ये भाजपचे आ.आशिष देशमुख यांना जबर धक्का बसला. रामटेकमध्ये शिवसेनेचा ‘आवाज’ काढण्यात भाजपला यश आले. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांचा निसटता विजय झाला. तर गोंदियात माजी नगराध्यक्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक इंगळे विजयी झाले. सावनेर, खापा, कळमेश्वरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांचा फुगा फुटला. कामठी व मोहप्याने काँग्रेसची लाज राखली. सेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रामटेकच्या गडावरून शिवसेनेचा कडेलोट झाला. तर काँग्रेसचे आ. सुनील केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघातील सावनेर, खापा, कळमेश्वर या तिन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली. मोहपा येथे राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्यामुळे काँग्रेसची लाज राखली गेली. सावनेरमध्ये रेखा मोवाडे, खापामध्ये प्रियंका मोहटे व कळमेश्वरमध्ये स्मृती इखार यांनी कमळ फुलविले. उमरेड येथे माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे गेल्या दहा वर्षांपासून असलेली सत्ता टिकवू शकले नाहीत. येथे भाजपने २५ पैकी १९ जागा जिंकल्या. (प्रतिनिधी)