शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

नागपूर मध्यवर्ती कारागृहास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट !

By admin | Published: April 21, 2015 1:14 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक मध्यवर्ती कारागृहाला भेट देत तब्बल तासभर कारागृहाची पाहणी केली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी जेल ब्रेकचा स्पॉट

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक मध्यवर्ती कारागृहाला भेट देत तब्बल तासभर कारागृहाची पाहणी केली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी जेल ब्रेकचा स्पॉट बघितला आणि विविध बराकींसह अंडासेलचीही पाहणी केली. जेल ब्रेकच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तुरुंग प्रशासनाकडून बारीकसारीक माहिती घेतली. विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री नागपुरात आले. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी चालकाला थेट मध्यवर्ती कारागृहाकडे जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा काफिला सकाळी ८.३० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर धडकला. अचानकपणे मुख्यमंत्री कारागृहात पोचल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी ज्या बराकीतून कैदी पळाले, ती बराकी तसेच ज्या दिशेने कैदी पळाले, तो आतबाहेरचा भाग, भिंतीचे निरीक्षण केले. कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेतानाच येथे आणखी काय सुधारणा करायला हव्यात त्याचीही माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त एस.पी. यादव, सहआयुक्तअनुपकुमार सिंह होते. (प्रतिनिधी)