नागपूरः शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढेंनी 28 जानेवारीला नागपूर महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी तिकडेही कारवाईचा धडाका लावला आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोडवरच्या बंगल्यावर हातोडा फिरवला आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या 8 हजार 460 चौरस फूट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी 12च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला असून, तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे. आंबेकरने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता आलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केले होते.आंबेकरने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता आलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पाडकामाला सुरुवात केली आहे. कर्तव्यनिष्ठ मुंढे कडक कारवाईसाठी प्रसिद्धतुकाराम मुंढे हे नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महापालिकांमध्ये आयुक्तपदाचा पदभार सांभाळलेला आहे. नवी मुंबई आणि नाशिकसारख्या महापालिकांमध्ये आयुक्त असताना त्यांचा कायम राजकीय नेत्यांबरोबर वाद झालेला होता. कोणत्याही अनधिकृत कामाला ते थारा देत नाहीत. तसेच कितीही बदल्या झाल्या तरी ते राजकारण्यांच्या दबावापुढे झुकत नाहीत. तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत. आता त्यांनी नागपूर महापालिकेतही आपल्या कामाचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे.
कुख्यात गुंडाच्या बंगल्यावर फिरवला हातोडा; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 7:53 PM
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या 8 हजार 460 चौरस फूट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे.
ठळक मुद्दे कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोडवरच्या बंगल्यावर हातोडा फिरवला आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी 12च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला असून, तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे.