मुंबई, दि. 29 - आसनगाव आणि वाशिंद दरम्यात वेहरोळी वस्ती जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकान ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली.
एक्स्प्रेसच्या इंजिनसह 9 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाल्याचे वृत्त आहे. रेल्वे पोलीस, डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.
दरम्यान, दुरांतो एक्स्प्रेसनं मुंबईकडे येणारे आमदार वा. को. गाणार , माजी आमदार डॉ. खुशाल बोभचे आणि आशीष जयस्वाल सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
इंजिनशिवाय SLR, H1, A1, A2, A3, B1, B2, B3, B4 हे डबे घसरले आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी होता. तसंच डबे रुळावरुन घसरल्यानंतर काही प्रवासी बर्थवरुन पडून किरकोळ जखमी झाल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
हेल्पलाईन क्रमांकसीएसटीएम 022-22694040,ठाणे 022-25334840,कल्याण 0251– 2311499,दादर 022-24114836,नागपूर 0712-2564342
लोकल विस्कळीत9 डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस रखडल्या आहेत.
गाड्यांची स्थितीफिरोजपूर-सीएसएमटी पंजाब मेल इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबलीमनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीजवळ रखडलीमनमाड-एलटीटी एक्स्प्रेस आज रद्द
स्टेशन्सवर खोळंबलेल्या रेल्वे गाड्यासेवाग्राम, जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडला उभीगरीबरथ लासलगावला उभीजनता एक्स्प्रेस अस्वली स्टेशनला उभीपंचवटी एक्स्प्रेस घोटीला तर पंजाब मेल इगतपुरीत थांबून आहे