नागपूर महापालिकेतील भाजपा नगरसेवकांसोबतचा वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार मी स्वत:ला होम आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसात माझ्याशी संपर्क आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
तुकाराम मुंढे यांचा नागपुरातील कार्यकाळदेखील वादग्रस्तच राहिला. लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.
तुकाराम मुंढे यांची कारकीर्द...
2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर
2007 प्रकल्प अधिकारी, धारणी
2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड
2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद
2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक
2010 के. व्ही. आय. सी. मुंबई
2011 जिल्हाधिकारी, जालना
2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर
2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई
2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका
2017 पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे
2018 नाशिक महापालिका आयुक्त
2018 नियोजन विभाग, मंत्रालय
2019 एडस नियंत्रण प्रकल्प संचालक
2020 नागपूर महापालिका आयुक्त
14 वर्षात 14 ठिकाणी बदल्या
आपल्या आक्रमक शैलीसाठी तुकाराम मुंढे राज्यात ओळखले जातात. त्यांच्या या शिस्तप्रियतेमुळे ते फार काळ कुठेच टिकले नाहीत. मुंढे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवेत आल्यानंतर प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. आतापर्यत 14 वर्षात त्यांच्या तब्बल 14 वेळा बदल्या झाल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न
शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज
CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य
एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले
सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन
किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'