शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूरच्या पत्रकारितेचा देशाला अभिमान

By admin | Published: September 14, 2014 1:08 AM

नागपूरच्या पत्रकारितेचा एक गौरवशाली इतिहास आहे. येथील पत्रकारिता ही नेहमीच परिपक्व राहिलेली असून देशाला नागपूरच्या पत्रकारितेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार

अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार : बनवारीलाल पुरोहित यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरच्या पत्रकारितेचा एक गौरवशाली इतिहास आहे. येथील पत्रकारिता ही नेहमीच परिपक्व राहिलेली असून देशाला नागपूरच्या पत्रकारितेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी आज येथे केले. मानव मंदिर नागपूर आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्लेखनीय पत्रकारितेसाठी ‘स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१३ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांना आ. अनिल सोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये, शाल व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी कुळकर्णी यांच्या पत्नी साधना कुळकर्णी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शनिवारी पंचशील चौक येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बनवारीलाल पुरोहित बोलत होते. माजी खासदार दत्ता मेघे प्रमुख अतिथी होते. मानव मंदिरचे अध्यक्ष गिरीश गांधी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी, हेमंत गांधी यावेळी व्यासपीठावर होते. बनवारीलाल पुरोहित पुढे म्हणाले, सध्या पत्रकारितेमध्ये परिश्रम कमी झाल्याचे दिसून येते. शोधपत्रकारितेत कमतरता आली आहे, असे असले तरी पत्रकाराचे काम हे अन्यायाविरुद्ध लढणे आहे. त्यामुळे पत्रकाराने कधीच रिटायर होऊ नये. पत्रकारितेतील उच्चतम आदर्श पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले. आ. अनिल सोले म्हणाले, बाळ कुळकर्णी हे एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व आहेत. अनेक वर्षांपासून आपण त्यांना पाहत आलो आहोत. ते वरिष्ठ पत्रकारांसारखे कधी वागलेच नाही. सर्वांसोबत सहजपणे ते वावरतातच हा त्यांचा मोठेपणा आहे. ते एक चांगले वक्ते व संचालनकर्ते असल्याने अनेक कार्यक्रम त्यांच्या संचालनामुळेच मोठे झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. दत्ता मेघे यांनीसुद्धा बाळ कुळकर्णी यांच्या वक्तृत्त्वाची प्रशंसा केली. ते एक चांगले पत्रकार तर आहेच परंतु ते उत्तम वक्ता सुद्धा आहेत. गिरीश गांधी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वर्धाचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी संचालन केले. अनुपम सोनी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साधनं आली पण साधना गेलीपत्रकारितेच्या क्षेत्रात पूर्वी आजच्यासारखी साधनं नव्हती, मात्र साधना भरपूर होती. आज साधनं भरपूर झाली आहेत, मात्र साधना संपली आहे, अशी खंत बाळ कुळकर्णी यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. लोकमतच्या परिस्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने झाल्याचा उल्लेख करीत लोकमतने दिलेल्या संधीमुळेच आपण घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा आणि लोकमत समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्याप्रति त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.