वसई : नायगाव पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचा काही भाग गुुरुवारी सकाळी कोसळला. कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी बांधकाम सुुरु असताना पुलाचा काही भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात येते. नायगावच्या पूर्वे-पश्चिमेला जोडणारा कोणताच मार्ग नव्हता. तसेच वसईच्या पश्चिमेकडील गावांना थेट महामार्गाशी आणि पूर्वेकडील गावांना वसईशी जोडणारा कोणताही मार्ग नव्हता. त्यासाठी नायगाव रेल्वे उड्डाणपूलाची मागणी केली जात होती. त्यानंतर नायगाव रेल्वे मार्गावर उड्डाणपूलाला मंजूरी मिळाली होती. एमएमआरडीए ५६ कोटी २५ लाख रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधत आहे. यामुळे मात्र, मंजूरी मिळाल्यानंतरही अनेक अडचणींमुळे पूलाचे प्रत्यक्षात काम सुुरू होत नव्हते. अनेक अडथळे पार केल्यानंतर या पुलाचे काम २०१५ मध्ये सुरु करण्यात आले होते. सध्या अतिशय संथ गतीने काम सुरु आहे. अशातच गुरुवारी सकाळी नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपुलाचा मधला भाग कोसळला. उड्डणपूलाच्या दोन बिनला जोडणारे दोन गर्डर खाली कोसळले. कोसळलेला भाग दूरवर असल्याने जिवीतहानी झाली नाही. मात्र, बांधकाम सुरु असतानाच कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
नायगाव पुलाचा गर्डर कोसळला
By admin | Published: January 20, 2017 3:23 AM