शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विधवेला नग्न अंघोळीची शिक्षा

By admin | Published: February 03, 2016 3:32 AM

नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात

नाशिक : नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात ठेवण्याची शिक्षा अमानवीय सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या फतव्याविरोधात संताप व्यक्त होत असून, पीडित महिलेने नाशिक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील महिलेचा १७ डिसेंबर २००० मध्ये नंदुरबारच्या युवकाशी विवाह झाला होता. २०१३ मध्ये तिच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या मावस दिराने तिच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. तिने नकार देताच त्याने तिच्या सासू व दिराला खोटी माहिती दिली. त्यातून महिलेस मारहाण झाली. मावसदिराने तिचा विनयभंगही केला. त्यानंतर जातपंचायतीचे दीपक तमायचेकर, ज्ञानेश्वर गुमाने व कांती नेतले यांनी महिलेच्या आई-वडिलांना बोलावून घेत जातपंचायतीत प्रकरणाचा निवाडा करण्याचा सल्ला दिला. जातपंचायतीने छळ करणाऱ्यांना सोडून महिलेवरच अनैतिक संबंधांचे आरोप लावले. त्यानंतर पीडित महिला ओझरला माहेरी राहू लागली. मात्र त्यानंतर पंचकमिटीने तिला त्रास देणे सुरूच ठेवले. (प्रतिनिधी)कथित कलंकित महिलेने पंचांसमोर फक्त सव्वा मीटर कापडाने अंग झाकावे. तिने १०७ पावले चालावे. तिच्यासोबत दोन महिला असतील. त्यापैकी एक तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारील, तर दुसरी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल. यानंतर महिलेला पंचांसमोरच दूध व पाण्याने अंघोळ करावी लागेल.