मुंबई : महापालिकेच्या नालेसफाईत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा घोटाळा सिद्ध करून दाखवावा अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे. सत्तेत भागीदारी असलेल्या सेना-भाजपा युतीतच नालेसफाईवरून जुंपल्याचे यावरून दिसून आले आहे. शेवाळेंचे शेलार यांना खुले आव्हानमुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या नालेसफाई कामात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी नालेसफाईत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे सिद्ध करावे, अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी दिलेपालिकेने नालेसफाईचे दोन वर्षाचे कंत्राट २८१ कोटींना दिले आहे. यामधील १४० कोटीचे कंत्राट एका वर्षाचे आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी ६० टक्के नालेसफाई होते. त्याचे ८४ कोटी रुपये होतात. त्यापैकी केवळ १६ टक्के रक्कम कंत्राटदारांना देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम अद्यापही कंत्राटदारांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे नालेसफाईत १०० कोटींचा घोटाळा झाला नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले. हा आरोप बालिश आणि बिनबुडाचा आहे. शेलारांनी पालिकेची बदनामी करणे थांबवावे. तसेच मुख्यमंत्र्यानी याप्रकरणी लक्ष घालून शेलार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही यावेळी शेवाळे यांनी केली. (प्रतिनिधी)
नालेसफाईवरून युतीत जुंपली !
By admin | Published: September 23, 2015 1:34 AM