पंकज रोडेकर - ठाणो
जिल्हा विभाजनानंतर नव्या पालघर जिल्ह्यात समाविष्ट झालेल्या नालासोपारा पोलीस ठाण्यात वर्षाला 8क्क् हून अधिक गुन्हे दाखल होत आहेत. ठाणो - पालघर या दोन्ही जिल्ह्यांत सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे हे एकमेव पोलीस ठाणो ठरले आहे. पालघर जिल्ह्यातील 22 पोलीस ठाण्यांपैकी 12 पोलीस ठाण्यांत वर्षाला प्रत्येकी सव्वाशेहून अधिक गुन्हे नोंदविण्यात येत असल्याने नव्याने आलेल्या पोलीस अधीक्षकांना तेथील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे कडवे आव्हानच राहणार आहे.
नव्या ठाणो जिल्ह्यात राहिलेल्या 15 ठाण्यांपैकी मीरा रोड ठाण्यात वर्षाला सर्वात जास्त साडेपाचशे गुन्हे दाखल होत आहेत. तर 11 पोलीस ठाण्यांत प्रत्येकी 1क्क् हून अधिक गुन्हे दाखल होत असल्याची माहिती सूत्रंनी दिली. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याच्या विभाजनापूर्वी 2क्13 मध्ये 7 हजार 198 गुन्हे नोंदविले गेले होते. 2क्14 च्या मागील सहा महिन्यांत 4 हजार 1क्8 गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर त्या जिल्ह्यात 22 पोलीस ठाण्यांचा समावेश झाला आहे. त्यानुसार 2क्क्9 सालापासून प्रत्येक पोलीस ठाण्याद्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी तयार करण्यात आली. 2क्13 मध्ये नालासोपारात सर्वाधिक 823 गुन्हे दाखल असून त्यापाठोपाठ विरार -539, वालीव - 5क्6, माणिकपूर 316, वाडा 247, बोईसर 189, मनोर 178, वसईत 171, अर्नाळा 157, कासा 15क्, तलासरी 143 आणि पालघर 129 गुन्हे दाखल झाले आहेत. 2क्12 पासून सुरू असलेल्या वालीव ठाण्यात वर्षभरातच 434 गुन्हे दाखल झाले असून 2क्13 मध्ये 5क्6 तर 2क्14 मध्ये 225 गुन्हे दाखल झाले आहेत. नालासोपा:यात चालू वर्षात 3क्3 गुन्हे नोंदण्यात आले. 2क्13 मध्ये पालघर जिल्ह्यातील 22 पोलीस ठाण्यात एकूण 4,क्95 गुन्हे दाखल झाले असून चालू वर्षात 1,831 दाखल झाले आहेत.