मुंबई : कांदिवलीच्या पोईसर नाल्यामध्ये शनिवारी रात्री एक महिला बुडाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तिला वाचविण्याचा प्रयत्न एका रिक्षावाल्याने केला, जो अयशस्वी ठरला. त्या महिलेची अद्याप काहीही माहिती मिळाली नसून या प्रकरणी कांदिवली पोलीस चौकशी करीत आहेत.मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यात नाल्यांची सफाई योग्य प्रकारे न झाल्याने लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. कांदिवलीच्या पोईसर नाल्यातदेखील अशाच प्रकारे एक महिला बुडाली. वाचवा.. वाचवा.. असे ओरडणाऱ्या त्या महिलेचा आवाज एका रिक्षाचालकाने ऐकला आणि थेट नाल्यातच उडी मारली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तिचे निव्वळ हातच पाण्याबाहेर दिसत होते. त्या रिक्षाचालकाने बरेच अंतर पोहत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाऊन त्यातच दिसेनाशी झाली. त्यामुळे ती महिला नक्की कोण होती, कुठे राहायची याबाबत काहीच समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
नाल्यात महिला बुडाली?
By admin | Published: July 04, 2016 5:02 AM