म्हसळा : पाऊस जवळ आल्याने म्हसळा नगरपंचायतीने शहरातील गटारे साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र गटारे साफ के ली तरी या गटारांची खोली आणि रुंदी कमी असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यावर्षी ३७ लाख रु पयांचे टेंडर काढण्यात आले आहे. म्हसळ्यातील सर्व गटारांची खोली फार कमी असून रु ंदी अतिशय कमी आहे, त्यामुळे पावसाळ्यात ही गटारे तुडुंब भरून वहातात. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटारातील संपूर्ण पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अनेक वेळा अडथळा निर्माण होतो. एवढा प्रचंड निधी असताना नगरपंचायतीने प्रथम गटारांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे अत्यावश्यक होते, परंतु तसे न करता के वळ गटारातील गाळ काढला जात आहे. दरवर्षी दिघी रोड आणि म्हसळ्यातील बँक आॅफ इंडियासमोरील नवेनगर भागात जोरदार पाऊस पडला की दिघी रोड व नवेनगर या भागात वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. दरवर्षी होणाऱ्या अडचणींवर नगरपंचायत काय तोडगा काढते, अशी चर्चा म्हसळा शहरात सुरु आहे. (वार्ताहर)
म्हसळ्यात नालेसफाई मोहीम
By admin | Published: June 10, 2016 3:04 AM