शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल - पीयूष गोयल

By admin | Published: June 10, 2017 12:35 PM

आमच्या सरकारने मागच्या तीनवर्षात शेतकरी आणि खेडयांकडे जास्त लक्ष दिले. एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के...

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - आमच्या सरकारने मागच्या तीनवर्षात शेतकरी आणि खेडयांकडे जास्त लक्ष दिले. एखाद्या संकटात शेतक-याचे नुकसान झाले तर, शेतक-यांना 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरु केलेली फसल विमा योजना उपयुक्त ठरली असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते  ‘लोकमत ऊर्जा समिट २०१७’ मध्ये बोलत होते. ‘सर्वांसाठी ऊर्जाच घडवेल देशाचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित ऊर्जा समिटचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती. आमच्या सरकारने महागाई 12 टक्क्यावरुन 3 टक्क्यांवर आणली. 
 
आणखी वाचा 
पीयूष गोयल यांच्या भाषणातील मुद्दे 
- गेल्या तीनवर्षात सरकारने जास्त लक्ष दिले असेल तर शेतकरी आणि खेडयांकडे
- गेल्या तीनवर्षात खताची एकदाही कमतरता भासली नाही, खत व्यवहारातील दलाल आम्ही नष्ट केले. 
- केवळ बजेटमध्ये घोषणा करणे आमचे उद्दिष्टय नाही, परिणाम काय येतात त्याकडे आम्ही लक्ष देतो. 
- पूर्वी बजेट पास व्हायला मे महिना उजाडायचा, खरा खर्च करण्यास वर्षातले शेवटचे काही महिने उरायचे, पण आता बजेटमधला खर्च करण्यास पुरेसा वेळ मिळतो.
- महागाई 12 टक्क्यावरुन सरकारने 3 टक्क्यावर आणली. 
- 2014 मध्ये चालू खात्यात तूट, महागाई जास्त होती. 
- स्वतंत्र भारतात सर्वात सक्षम अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांच्या कार्यकाळात चालू खात्यातील तूट, महागाई कमी झाली. 
  - जीएसटीमुळे सेवांचा दर्जा सुधारेल, वस्तूंच्या किंमती कमी होतील, पारदर्शकता वाढेल. 
 
देशात सर्वांनी 100 टक्के LED दिव्यांचा वापर केला तर, देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील त्याचबरोबर 112 अब्ज युनिट वीजही वाचेल असे केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 
 
 
कोळसा आता सरप्लस असून, कोळसा आयात बंद करुन आपण स्वत: सक्षम झालो आहोत असे पीयूष गोयल यांनी सांगितले. सर्वांना 24 तास वीज मिळावी यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये लोकमतच्या या समिटमुळे मदत होईल असे सांगताना त्यांनी लोकमतच्या ऊर्जा समिट आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. 
 
18,500 गावाना 1 हजार दिवसात वीज पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता 600 दिवस झाले असून 3800 गावात वीज जोडणी बाकी आहे. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर छप्पर, पाणी आणि वीज देण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे गोयल म्हणाले.