शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

‘हेक्स वर्ल्ड’चा भूखंड नावावर करा

By admin | Published: January 23, 2017 4:21 AM

खारघरमधील देविशा इन्फ्रास्ट्रचर या छगन भुजबळ यांच्या मालकीच्या कंपनीने दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडून बुकिंग घेऊन, हेक्स सिटी

वैभव गायकर / पनवेलखारघरमधील देविशा इन्फ्रास्ट्रचर या छगन भुजबळ यांच्या मालकीच्या कंपनीने दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडून बुकिंग घेऊन, हेक्स सिटी हा प्रकल्प उभारायला सुरुवात केली होती. मात्र, भुजबळ यांना अटक झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. हे पैसे परत मिळावेत, म्हणून ग्राहकांनी एकत्र येऊन हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून, कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. त्याकरिताच ग्राहकांनी रविवारी बैठक घेतली. यात संबंधित भूखंड हा ग्राहकांनी स्थापन केलेल्या संस्थेला हस्तांतरण करावा, अशी मागणी करण्यात आली असून, याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे. २०१० पासून संबंधित कंपनीकडून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी चालढकल होत असल्याने, या प्रकल्पात बुकिंग केलेल्या ग्राहकांनी रविवारी एकत्र येऊन निदर्शने केली. खारघरमधील भूखंड क्र मांक ९१, ९४, ९५, १००, १०२, १०३ वर हा प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र, छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित अनेक प्रकल्पांना सील ठोकण्यात आले. या प्रकल्पामध्ये खारघरच्या हेक्स सिटी प्रकल्पाचाही सहभाग आहे. या प्रकल्पात जवळपास २,३४४ ग्राहकांनी घरांचे बुकिंग केले असून, त्यांचे सर्वांचे मिळून कोट्यवधी रुपये या प्रकल्पात गुंतले आहेत. प्रकल्पात घर बुक करणारे बहुतांश मध्यमवर्गीय असून, कर्ज काढून, आयुष्याची पुंजी अनेकांनी या ठिकाणी जमा केली आहे. हे पैसे परत मिळावेत, म्हणून ग्राहकांनी एकत्र येऊन हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून, कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही कायदेशीर लढा देतच राहणार, अशी प्रतिक्रिया हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लालासाहेब लोमटे यांनी दिली. (प्रतिनिधी)