शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दत्तू भोकनळने दिले पुरस्कारासाठी महिला कुस्ती मार्गदर्शकाचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 5:58 AM

‘खऱ्या’ प्रशिक्षकाची क्रीडा आयुक्तांंकडे तक्रार; रोइंग असोसिएशन करणार चौकशी

- शिवाजी गोरे

पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेतील रोइंग प्रकारातील सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळने शासनाच्या पुरस्कारासाठी महिला कुस्ती मार्गदर्शक अश्विनी बोºहाडे यांचे नाव दिले आहे. तब्बल १२ लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. दत्तूचे रोर्इंग मार्गदर्शक राजेंद्र शेळके यांनी क्रीडा आयुक्तांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे रोइंग असोसिएशनच्या सरचिटणीस मृदुला कुलकर्णी यांनी सांगितले.

इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी ५० लाख व त्याच्या मार्गदर्शकाला १२ लाख अशा पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाने केली होती. क्रीडा विभागाने मागविलेल्या अर्जामध्ये भोकनळ याने मार्गदर्शक म्हणून अश्विनी बोºहाडे यांचे नाव दिले. पुरस्कार सोहळ्यात धनादेशाच्या यादीत अश्विनी बोºहाडे यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. दत्तू पुण्यातील कॉलेज आॅफ मिलीटरी इंजिनीअरिंग (सीएमई) येथे सराव करतो. सीएमईमध्ये दत्तूचे मार्गदर्शक असलेल्या राजेंद्र शेळके यांनी याबाबत क्रीडा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. २०१५ मध्ये चीनमध्ये झालेल्या अशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने रौप्यपदक जिंकले होते. त्यावेळी त्याला ५ लाखांचा आणि मार्गदर्शक म्हणून शेळके यांना सव्वा लाखाचा पुरस्कार मिळाला होता.

मैदानावर उतरण्यापूर्वी खेळाडूची मानसिकता आणि तंदुरूस्ती हा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. भोकनळ यांना मी याबाबतचे मार्गदर्शन करीत आले आहे, असे कुस्ती मार्गदर्शिका अश्विनी बोºहाडे यांनी म्हटले आहे.

दत्तूने विश्वासघात करायला नको होता. तो एक साधारण सैनिक म्हणून बीईजीमध्ये भरती झाला होता. त्याची गुणवत्ता पाहून २०१३ मध्ये आर्मी रोइंग नॉड, सीएमईमध्ये सरावासाठी पाठविण्यात आले. तेथे मी वरिष्ठ मार्गदर्शक होतो. २०१६ मध्ये त्याची आॅलिम्पिक स्पर्धेसाठी शिबिरात निवड झाली. त्यावेळी मी सहायक मार्गदर्शक होतो, असा दावा रोर्इंग मार्गदर्शक सीएमई व भारतीय संघाचे सहायक मार्गदर्शक राजेंद्र शेळके यांनी केला आहे.

या प्रकाराची क्रीडा विभागाने शहानिशा तरी करायला हवी होती. खेळाच्या राज्य संघटनांचे अध्यक्ष किंवा सरचिटणीसांना विचारायला हवे होते. याबाबत राज्य संघटना चौकशी करणार आहे.-मृदुला कुलकर्णी, सरचिटणीस, महाराष्ट्र रोइंग असोसिएशन.