शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

मृत्यूवर विजय मिळविणाºया ‘त्या’ मुलीचं नाव ठेवलं ‘विजया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:50 AM

डॉक्टरांनी सुचवले नाव; घरात पाचव्या मुलीचा जन्म, तरीही ती झाली सर्वांना हवीशी...

ठळक मुद्देबेलाटी येथील शेतकरी सुरेश पोखरकर यांच्या घरात पाचव्या मुलीचा जन्म झालामाता सविता याही खूप आनंदात आहेत़ त्यांना श्रीहरी नावाचा पाच वर्षीय मुलगा पोखरकर कुटुंबीय हे वारकरी संप्रदायातील आहेत़ माता सविता या दत्ताच्या निस्सीम भक्त

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर :  एका मातेने सोलापुरात पाचव्या मुलीला जन्म दिला, तेही अत्यंत क्लिष्ट अशा हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतऱ ती माता सहाव्यांदा प्रसूत झाली असून, तिला पाचव्यांदा मुलगी झाली आहे़ विशेष म्हणजे ती माता आणि पिता यांच्यासह रुग्णालयातील कर्मचार वर्गाची ती लाडकी बनली आहे. मृत्यूवर विजय मिळविणाºया ‘त्या’ मुलीचं नाव ‘विजया’ ठेवण्यात यावे, असे तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी सुचविले आहे. 

बेलाटी येथील शेतकरी सुरेश पोखरकर यांच्या घरात पाचव्या मुलीचा जन्म झाला आहे़ माता सविता याही खूप आनंदात आहेत़ त्यांना श्रीहरी नावाचा पाच वर्षीय मुलगा आहे़ सहाव्यांदा गर्भवती असताना सातव्या महिन्यात तिला हृदयविकाराचा त्रास उद्भवला़ प्रसूतीकाळातच हृदयविकारावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे बनले़ पोटात बाळ आणि स्वत:चं हृदय दोन्ही संकटात सापडल्याची माहिती डॉ़ विजय अंधारे यांनी दिल्यानंतर माता अस्वस्थ झाल्या़ काहींनी त्यांना पोटातील बाळ नकोचा सल्ला दिला़ त्यांनी त्यास नकार दिला़ डॉ़ अंधारे यांनी पोखरकर कुटुंबीयांच्या परवानगीने माता सविता हिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली़ यास पंधरा दिवस उलटले.

नुकतेच तीन दिवसांपूर्वी मातेच्या पोटात कळा सुरू झाल्या़ तिला येथील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ती प्रसूत झाली आणि तिला मुलगी झाल्याची गोड बातमी डॉ़ स्नेहा चौधरी, डॉ़ सना मुन्शी तसेच डॉ़ तवसूम खान यांनी डॉ़ अंधारे यांना दिली़ मातेच्या तोंडी सर्वप्रथम माझी मुलगी कशी आहे, तिच्या जिवाला काही धोका तर नाही ना, हे शब्द निघालेत़ डॉ़ नाही असे म्हणताच मातेचे डोळे पाणावले़ डॉ़ शर्मिला गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली सविता यांची प्रसूती झाली.

माता म्हणाली, दत्ताची कृपा- पोखरकर कुटुंबीय हे वारकरी संप्रदायातील आहेत़ माता सविता या दत्ताच्या निस्सीम भक्त आहेत़ त्या गृहिणी असून बेलाटी येथील त्यांच्या शेतावर ते काम करतात़ तर पिता सुरेश पोखरकर हे संत तुकारामांचे भक्त आहेत, ते कीर्तनही करतात़ तसेच जमीन विक्री-खरेदीचा व्यवसायही करतात़ संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराजांच्या ते सेवेत असतात़ प्रत्येक वारीला ते पंढरपूरला पायी चालत जातात़ पत्नी गर्भवती असतानाही, वारी चुकवली नाही, हे विशेष़ पत्नी गर्भवती असताना तिला हृदयाचा त्रास असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते अस्वस्थ झाले़ सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी माता आणि तिच्या बाळाला धोका असल्याचे सांगितले़.

अखेर त्यांनी हृदयविकार तज्ज्ञ डॉ़ विजय अंधारे यांना भेटले़ त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली़ शस्त्रक्रियेदरम्यान मातेचे हृदय ४५ मिनिटे बंद ठेवले आणि बाळाला मशीनद्वारे कृत्रिम पद्धतीने रक्तपुरवठा करण्यात आला़ ही शस्त्रक्रिया अत्यंत दुर्मिळ आणि चॅलेंजिंग होती. असे असताना शस्त्रक्रिया यशस्वी होऊन प्रसूतीही नॉर्मल झाली, हे विशेष़ त्यामुळे पोखरकर यांनी देवावर टाकलेला विश्वास सार्थकी लागल्याची भावना ते व्यक्त  करतात. माता सविता म्हणाली, ही तर दत्ताची कृपा आहे़ 

‘विजया... विजया..’चा जल्लोष- डॉ़ अंधारे सांगतात, सदर केस माझ्याकडे आल्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केली़ अशा प्रकरणात यापूर्वी कुणी शस्त्रक्रिया केली आहे का, याबाबत बंगळुरू येथील माझे गुरू प्रा़ डॉ़ प्रसन्ना सिम्हा यांच्याशी चर्चा केली़ त्यांनी ३ शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली आणि तिन्ही केसमध्ये बाळाला वाचवता आले नाही, असे ते सांगितले़ त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो़ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते़ या प्रकरणी पेशंट आणि तिच्या पतीशी चर्चा केली़ त्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले़ त्यानंतर शस्त्रक्रिया केली़ शस्त्रक्रिया यशस्वी झाली़ सध्या बाळ आणि माता दोघेही सुखरूप आहेत़ सविता यांनी मला बाळास गोंडस नाव देण्याची सूचना केली़ मृत्यूवर विजय मिळवणारी विजया असे ठेवता येईल, अशी सूचना आमच्याच स्टाफकडून झाली़ आणि संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच जल्लोष आणि आनंद सुरू झाला, विजया़़़ विजया़़़चा़़़

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल