काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे, अमित देशमुखांसह विश्वजीत कदमांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 07:45 PM2019-09-29T19:45:40+5:302019-09-29T19:48:34+5:30

या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे. 

Names of 51 Congress candidates of maharashtra assembly election, amit deshmukh got ticket | काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे, अमित देशमुखांसह विश्वजीत कदमांना संधी

काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे, अमित देशमुखांसह विश्वजीत कदमांना संधी

Next

काँग्रेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत बहुतांश विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नितीन राऊत, विश्वजीत कदम यांच्या नावांचा समावेश आहे. 
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तेवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड उत्तरमधून डीपी सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे. 

पाथरी मतदारसंघातून सुरेश वरपूडकर यांना, फुलंब्री मतदारसंघातून डॉ. कल्याण काळेंना उमेदवारी दिली आहे. 

पुणे कंटोन्टमेंट येथून रमेश बागवेंना उमेदवारी दिली आहे, हा मतदारसंघ राखीव आहे. कुल्याब्यातू अशोक उर्फ भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूरमधील अमित विलासराव देशमुख, औसा मतदारसंघातून बसवराज पाटील. तुळजापूर मधुकर चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

 

Web Title: Names of 51 Congress candidates of maharashtra assembly election, amit deshmukh got ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.