लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विरोध दर्शविला आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नामविस्तार न करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते.नर्सरीसाठी आणणार कायदापूर्व प्राथमिक अर्थात नर्सरी शिक्षणावर नियंत्रित आणण्यासाठी कायदा तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरु आहे. या कायद्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याची परवानगी, शिक्षण शुल्क, पायाभूत सुविधा, प्रवेश प्रक्रीया, अभ्यासक्रम आदी बाबींचा समावेश करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भाजपा सदस्य अपूर्व हिरे यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
नामविस्ताराला सोलापूर विद्यापीठाचाच विरोध - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 4:56 AM