मुंबई – मुख्यमंत्री कुठल्याही पत्राला उत्तरं देत नाहीत अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) वारंवार करत असतात. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. लोकमतच्या फेस टू फेस या मुलाखतीत पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना त्यांचा दोष सांगत त्यांना एक सल्लाही दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, कोविडसारख्या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले. धार्मिक स्थळं बंद होती म्हणून अनेक टीका त्यांच्यावर झाली. परंतु लोकांचा जीव वाचवणं यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी कठोर भूमिका घेतली त्यांच कौतुक आहे. परंतु आमदारांच्या पत्रांना उत्तरं दिली जात नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या पत्रावर उत्तर द्यावं असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेस आमदारांना निधी मिळावा यासाठी झगडावं
बाळासाहेब थोरात सरळ व्यक्तीमत्व आहे. कुणाचं मन माझ्यामुळे दुखू नये अशी त्यांची भूमिका आहे. जी राजकीय व्यवस्था राज्यात आहे. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातो असा आरोप आहे. काँग्रेस आमदारांना निधीचं वाटप कमी होते. काँग्रेसच्या हिस्स्यात जे काही आहे ते मिळाले पाहिजे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या आमदाराला जास्त निधी मिळेल यासाठी भांडावं असा सल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे. तर अशोक चव्हाण यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे. परंतु संकुचित भावना त्यांनी सोडली पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक
देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री पदही सांभाळले होते. विधिमंडळ अधिवेशनात नेहमी कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे खातं सांभाळायला कसरत करावी लागते. त्यामुळे गृह खातं दुसऱ्याला द्यावं असा सल्ला मी मित्र म्हणून दिला होता. पण या खात्याचे महत्त्व तुला आता कळणार नाही, या खात्याचा वापर कसा करेन हे भविष्यात कळेल असं फडणवीसांनी सांगितले होते. ते खातं कसं वापराचं आणि प्रशासन कसं चालवायचं त्यात ते एक्सपर्ट आहेत. परंतु काही घरं सोडायची असतात असा सल्ला मित्र म्हणून त्यांना देतो.
वडिलांची ‘ती’ अखेरची इच्छा पूर्ण करु शकलो नाही; नाना पटोलेंना गहिवरुन आले