शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Maharashtra Politics: “भारत जोडो योत्रेला प्रचंड जनसमर्थन, देशात परिवर्तन होण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 2:27 PM

Maharashtra News: या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारीपासून निघालेल्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारधारेला माननारे राज्य आहे. या पदयात्रेमुळे जनतेमध्ये भाजपने निर्माण केलेली भीती, द्वेष व दहशतीला चोख उत्तर देण्याचे बळ मिळाले आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड जनसमर्थन तर मिळालेच पण शेगावमध्ये अभूतपूर्व अशी विराट सभा झाली व राज्यातील जनतेने राहुलजींवर प्रेम व विश्वास व्यक्त केला. या पदयात्रेमुळे निर्माण झालेले काँग्रेसमय वातावरण राज्यभर कायम ठेवू, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला.

बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथील भारत जोडो यात्रेच्या कॅम्पमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा आता जनआंदोलन झाले आहे आणि ही यात्रा आता कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेने देशात परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट झाले असून खोटे बोलून सत्तेत आलेल्या व नंतर जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार जनताच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. ही पदयात्रा विशाल होईल व जनतेचे मोठे समर्थन मिळेल असे मी दोन महिन्यापासून सांगत होतो तेव्हा विरोधक आमची खिल्ली उडवत होते पण देगलूरपासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत मिळालेले जनसमर्थन राहुलजी गांधी व काँग्रेसवरचा विश्वास दृढ करणारे ठरले आहे. आता देशात परिवर्तन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला

यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्टातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेगावची सभा ही भारत जोडो यात्रेवर प्रेम व विश्वास दाखवणारी विशाल सभा झाली. सभेसाठीची २२ एकर जागा दुपारीच फुल्ल झाली होती. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी आले होते. तसेच पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता. बंजारा समाजाच्या ७ ते ८ हजार महिला पदयात्रेत सहभागी होऊन नारीशक्तीचे प्रदर्शन घडवले. मागील वर्षी मोदी सरकारला काळे कृषी कायदे रद्द करावे लागले. स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन केले त्यात ७०० शेतकरी शहिद झाले अखेर मोदी सरकारला झुकावे लागले व ते काळे कायदे रद्द करावे लागले. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय असून या निमित्ताने ‘शेतकरी विजय दिवस’ पाळला पाहिजे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या संदर्भात वारंवार विचारणी केली जाते की यावर उपाय काय? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाची कामे या भागात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तर विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले