शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

१६ तारखेला फायनल! '..तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत', 'मविआ'तील वादावर नाना पटोले स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 2:26 PM

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, ही नियुक्ती करताना शिवसेनेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घेतले नव्हते अशी खदखद काँग्रेस नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत बोलताना दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, असं सूचक विधान केलं आहे. 

महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीबाबत विचारलं असताना नाना पटोले यांनी ते स्वत: आणि बाळासाहेब थोरात पदयात्रेत व्यग्र आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित होते अशी माहिती दिली. तसंच आता १६ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा बैठक होणं अपेक्षित आहे अशीही माहिती नाना पटोले यांनी दिली. 

"दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत. आपल्याच मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत. ही महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी तसा निर्णय घेतला होता", असं महत्वाचं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. 

"मला ज्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं ठरलं होतं तेव्हा मी सगळ्यांना सांगायला गेलो होतो. पण ठिक आहे त्यांना फॉरमॅलिटी देखील पाळायची नसेल तर ठीक आहे कुणावरही जबरदस्त नाही. काँग्रेस हा जनतेतील पक्ष आहे आणि निश्चितपणे जनता काँग्रेससोबत आहे. आमच्या मित्रांनी प्रमाणिकपणे रहावे आणि विचारविनिमय करावा हीच विनंती. खालच्या सभागृहात अजित पवार आहेत आणि वरच्या सभागृहात नीलम गोऱ्हे आहेत. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी आमची इच्छा होती. आमच्या जागा कमी असल्याचा विषयच नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. नाहीतर त्यांचेही दहाच असते", असंही नाना पटोले म्हणाले.  

भाजपा एक वॉशिंग मशिन"भाजपा विरोधात बोललं की कारवाई होते. पाठीशी राहिलो की स्वच्छ होतो. भाजपा एक वॉशिंग मशिन आहे, असं आता सामान्य माणूस देखील बोलत आहे. भाजपाला त्याची लाज राहिलेली नाही. इंग्रज जसं करत होते तसंच भाजपावाले करत आहेत", असं नाना पटोले म्हणाले. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतची १२ तारीख आता २२ करण्यात आली आहे. डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया आहे. राज्यातील ईडी सरकार असंवैधानिक आहे. तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही ही आमची भूमिका आहे, असंही नाना पटोले पुढे म्हणाले. 

भाजपाकडून तिरंग्याचा अपमानस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हर घर तिरंगाच्या मोहिमेवरही नाना पटोले यांनी टीका केली. "जे तिरंगे घरी दिले जात आहेत त्यात अशोकचक्र मध्यभागी नाही. कारण ते चीनवरुन आयात केले जात आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर सगळं चीनवरुनच आयात होत आहे. चीनवरुन जे झेंडे आणले गेले आहेत त्यातून देशाचा अपमान झाला आहे. इतकंच काय तर परभणीत काल भाजपावाल्यानं चक्क तिरंग्यावर कमळ टाकलं होतं. आमच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्याचं काम भाजपा करत आहे. तिरंग्याचा अपमान करण्याचा अधिकार भाजपाला नाही", असं नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना