नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:11 AM2024-04-10T11:11:32+5:302024-04-10T12:07:59+5:30

Nana Patole's Car Accident: विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या आपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

Nana Patole's car met with a terrible accident, fortunately escaped, Congress made serious allegations against BJP | नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

भंडारा - लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विदर्भामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या आपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

नाना पटोलेंच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे, असा आरोप लोंढे यांनी केला. दरम्यान, या अपघातात मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,अशी माहितीही अतुल लोंढे यांनी दिली आहे. 

 भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील प्रचार सभा आटोल्यानंतर नाना पटोले हे आपल्या वाहनाने (एमएच ३१, एक्स झेड ७९७) खाजगी ताफ्यासह साकोली तालुक्यातील सुकळी या स्वगावी जाण्यास निघाले होते. दरम्यान भंडारापासून ७ किलोमीटर अंतरावरील भीलेवाडा या गावाजवळ मागेहून येणाऱ्या ट्रकची (सीजी ०४, एन टी ८७३९) त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. यात चालकाच्या मागच्या बाजुकडील भाग नुकसानग्रस्त झाला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर तातडीने कारधा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालक गोवर्धन कुचराम (चितापूर, ता. भंडारा) याला अटक केली. या अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांंनी ती पूर्ववत केली. या घटनेनंतर ताफ्यातील अन्य वाहनातून पटोले रात्रीच साकोलीकडे रवाना झाले.

Web Title: Nana Patole's car met with a terrible accident, fortunately escaped, Congress made serious allegations against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.