नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांनाविश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नाणारवर चर्चा सुरू झाल्यानतंर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी ही लक्षवेधी पुढे ढकलण्याची सूचना केली. त्यावरून एकच गोंधळ झाला.अखेर स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, नवीन रिफायनरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.त्यामुळे प्रदूषण होत नाही. अनेक देशात आधुनिक तंत्राचा वापर करून रिफायनरी उभारल्या जात आहे. राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी शासनाने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना यांना प्रदूषण व अन्य बाबींविषयी शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यास तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यास आयआयटी मुंबई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केलेली आहे. यांची अहवाल मिळाल्यावर व स्थानिक जनतेच्या शंका दूर झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करणार नाही. प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन शेतकऱ्यांनी देऊ केली आहे. त्यामुळे नाणारला शंभर टक्के शेतकºयांचा विरोध आहे, असे म्हणता येणार नाही. शिवसेनेचे मौननाणार प्रकल्पासाठी रस्त्यावर आणि सभागृहाच्या बाहेर विरोध करणाºया शिवसेनेने विधान परिषदेत मात्र मौनस्वीकारणे पसंत केले. विरोधकांनी अनेक प्रश्न विचारूनही नाणार प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया रद्द करण्याची अधिसूचना काढणारे शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई गप्प होते. यावरून शिवसेनेची सभागृहाबाहेरआणि सभागृहातील नाणारविषयीची भूमिका वेगवेगळी असल्याची टीका विरोधकांनी केली.
नाणार नाही लादणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:31 AM