मुंबई: नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सुरुवातीला नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मुंबई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचं निधन झालं.
नांदेडचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 5:03 AM