शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 19:10 IST

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितने आपल्या उमेदवाराची घोषणा केली. 

Nanded Lok Sabha By Election 2024 : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आतापर्यंत सर्वच पक्षांनी जवळपास आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकदेखील (Nanded Loksabha byelection) होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण, काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अविनाश भोसीकर यांनाच उमेदवारी दिली आहे. वंचितने लिंगायत समाजाचा चेहरा मैदानात उतरवला आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये वंचितचे अविनाश भोसीकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना एकूण ९२५१२ मते मिळाली होती. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर ४६९४५२ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. तर, काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी ५९४४२ मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, नांदेडच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजपला नांदेडसाठी उमेदवार मिळत नव्हता. पण, अखेर भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे भाऊ आहेत. आता नांदेड लोकसभेत मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार आणि ही लढत तिरंगी होते का हे पाहण्याजोगे असेल. 

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NandedनांदेडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी