शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

उज्वल नांदेडचे यश, स्पर्धा परिक्षा क्षेत्रात आता नांदेड पॅटर्न

By admin | Published: October 06, 2016 9:28 AM

स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचावला जावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वल नांदेड या मोहिमेची फळ पुढे येत आहे.

अनुराग पोवळे, ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. ६ -  स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा निकाल उंचावला जावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वल नांदेड या मोहिमेची फळ पुढे येत असून जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी पदासाठी ९, ज्येष्ठ अधिव्याख्याता पदासाठी २ तसेच सहायक सरकारी अभियोक्ता पदासाठी तिघांची निवड झाली आहे़ हा उपक्रम आता तालुकास्तरापर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली़राज्यात नांदेड जिल्ह्याने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे़ अनेक कामांमध्ये नांदेड पॅटर्न पुढे आला असून आता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातही जिल्ह्यातील विद्यार्थी पुढे यावेत यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरांचे विविध टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात येत आहे़ जिल्हाधिकारी काकाणी यांच्या संकल्पनेतून उज्ज्वल नांदेड ही संकल्पना पुढे आली़ केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ या पदांच्या परीक्षेत निकाल उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत़ तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना विविध अधिकाऱ्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते़ त्यांनी स्वत:ही अनेकवेळा मार्गदर्शन करून वातावरण निर्मिती केली होती़ ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी काकाणी यांनी जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित करणे, मार्गदर्शन देणे यासाठी उज्ज्वल नांदेड ही मोहिम हाती घेतली़ या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल ते जून १६ या कालावधी १० परीक्षा मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले़ दुसऱ्या टप्प्यात शहरातील यशवंत महाविद्यालय आणि पीपल्स कॉलेजमध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत आहे़ यासोबतच दर महिन्याच्या ५ तारखेला डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात राज्यातील अधिकारी, अभ्यासकांचे एका विषयावर व्याख्यान घेतले जात आहे़ ही व्याख्याने प्रेरणा, प्रोत्साहन देणारी इतकीच मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना आता ठराविक विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले जात आहे़ यावेळी व्याख्यात्यांशी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधीही दिली जात आहे़ तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले जात आहे़१३ विद्यार्थी झाले अधिकारी- शहरात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे फळ आता हाती येत आहेत़ एप्रिल १६ पासून झालेल्या विविध विभागांच्या निकालात उज्ज्वल नांदेड शिबीरांचा लाभ घेतलेल्या १३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे़ यात १३ अधिकारी झाले आहेत़ उज्ज्वल नांदेड उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या अभिरूप मुलाखतींचा लाभही विद्यार्थ्यांना झाला जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी पदासाठी ९ विद्यार्थी निवडले गेले आहेत़ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता पदासाठीही आणि सहायक सरकारी अभियोक्ता या वर्ग १ पदासाठी ३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत़ त्यात मनोज देशपांडे हा राज्यातून दुसऱ्या स्थानी तर विशाल परदेशी हा १६ व्या आणि व्यंकटेश पोटफोडे हा ३० व्या स्थानी आहे़

- उज्ज्वल नांदेडच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, सहायक समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले आदी परिश्रम घेत आहेत़ दरम्यान, शहरात सुरू असलेला उज्ज्वल नांदेड हा उपक्रम आता तालुकास्तरावर पोहोचविण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले़- या मोहिमेअंतर्गत ५ आॅक्टोबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ५ वा़ महापालिका अधिकारी माधवी मारकड यांचे व्याख्यान होणार आहे़ जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़